Jawan sequel: ‘जवान’च्या भरगोस यशानंतर येणार ‘जवान २’.? चित्रपटातून मिळाली मोठी हिंट.!

मनोरंजन

शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाचे गेले अनेक महिने सर्वत्र प्रचंड चर्चा आहे. अखेर आज हा बहुप्रतीक्षित चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. तर आता या चित्रपटाच्या एका सीनमुळे या चित्रपटाचा सिक्वेल येणार अशी हिंट मिळाली असल्याची चर्चा सुरू झाल्या आहेत.

   

‘जवान’ने पहिल्या दिवशी ७५ कोटींची दणदणीत कमाई केली. त्यावरून हा चित्रपट करून प्रेक्षकांना खूप आवडला हे सिद्ध झालं आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावर ‘जवान २’ची मागणीही केली. आता अक्षक चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आली आहे. या चित्रपटाचा दूसरा भाग प्रदर्शित होऊ शकतो.

स्पॉटबॉयच्या वृत्तानुसार, निर्मात्यांनी चतुराईने ‘जवान’च्या क्लायमॅक्स सीनद्वारे ‘जवान २’ ची घोषणा केली आहे. चित्रपटाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये जवान (शाहरुख खान) आणि माधवन नाईक (संजय दत्त) आणखी काही मिशनबद्दल बोलताना दिसत आहेत. यानंतर, शेवटच्या सीनमध्ये माधवन जवानाकडे एक लिफाफा धरून निघून जातो असं दाखवण्यात आलं आहे. या सीननंतर जवानाला या लिफाफ्यात पुढील मिशन देण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, या सर्व आत्तापर्यंत केवळ चर्चाच आहेत कारण अद्याप ‘जवान २’बद्दल निर्माते किंवा शाहरुख कोणीही अधिकृतरित्या बोललेले नाहीत.

हे वाचा:   मलायका अरोराचं खरं वय ऐकल्यानंतर बसेल जबरदस्त धक्का, अभिनेत्रीनं तब्बल 8 वर्षाचा केला आहे झोल.? 'त्या' Video मुळे आलं सत्य समोर..

दरम्यान, या चित्रपटाला सर्वत्र खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाने जगभरातून १०० हून अधिक कोटींची कमाई केली आहे. त्यामुळे आता खरोखरच या चित्रपटाचा दूसरा भाग येणार का याकडे सर्वांचं लागलं आहे.

Leave a Reply