सलमाननं केलं लॉन्च; पण कतरीनामुळं बरबाद झालं या अभिनेत्रीचं करिअर; म्हणाली ‘मी सलमानसोबत….’

मनोरंजन

आजवर सलमान खानने अनेक अभिनेत्रींना बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं. त्यातीलच एक अभिनेत्री म्हणजे झरीन खान. तिने सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. 2010 पासून सिनेसृष्टीत काम करत असणाऱ्या झरीन खानला आपलं स्थान अद्याप निर्माण करता आलेलं नाही. पहिल्या चित्रपटापासूनच झरीन खानची तुलना बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री कतरिना कैफशी व्हायची. कतरिना सोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमाननं जाणून बुजून तिच्यासारख्या दिसणाऱ्या झरीनला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं. पण कतरिनाशी होत असलेल्या तुलनेवर आता झरीनने इतक्या वर्षांनी मौन सोडलं आहे.

बॉलीवूड अभिनेत्री झरीन खान तिच्या लूक आणि ग्लॅमरस स्टाइलमुळे बरीच प्रसिद्धी मिळवली आहे. मात्र बॉलिवूडमध्ये वर्षानुवर्षे मेहनत करूनही तिला यश मिळालं नाही. 2010 पासून सिनेसृष्टीत काम करत असणाऱ्या झरीन खानला आपलं स्थान अद्याप निर्माण करता आलेलं नाही.

हे वाचा:   नागराज मंजुळे घेऊन येणार या सुपरहिट चित्रपटाचा दुसरा भाग; चाहत्यांची उत्सुकता वाढली

झरीन खानने सलमान खानसोबत ‘वीर’ चित्रपटातून डेब्यू केला होता. झरीन खानची तुलना बॉलिवूडची सुपरस्टार अभिनेत्री कतरिना कैफशी व्हायची. कतरिना सोबत ब्रेकअप झाल्यानंतर सलमाननं जाणून बुजून तिच्यासारख्या दिसणाऱ्या झरीनला बॉलिवूडमध्ये लॉन्च केलं. पण कतरिनाशी होत असलेल्या तुलनेवर आता झरीनने इतक्या वर्षांनी मौन सोडलं आहे.

झरीन खान नुकतीच भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाली होती. यावेळी ती म्हणाली, ‘सलमान खानचा ‘वीर’ चित्रपट रिलीज झाल्यानंतर माझं आयुष्य खूप वाईट झालं होतं.’ ‘लोक मला खोट्या कतरिना कैफच्या नावाने ट्रोल करत होते. या चित्रपटाने माझं संपूर्ण आयुष्यच बदलून टाकलं. कतरिना कैफसोबत माझी तुलना केली जात आहे याचा मला सुरुवातीला आनंद वाटत होता पण नंतर मला जाणवलं की यामुळे इंडस्ट्रीत गोष्टी खराब होत आहेत.’

हे वाचा:   पांढऱ्या रंगाचा टॉप घातलेली ही लाजाळू मुलगी आता बॉलिवूडची किसिंग एक्ट्रेस म्हणून ओळखली जाते, नाव माहीत आहे का?

झरीन खान मुलाखतीत पुढे म्हणाली, ‘मी त्यावेळी खूप जाड होते. त्यामुळे कतरिना कैफशी तुलना होणे ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती, मात्र प्रत्यक्षात माझ्या बाबतीत उलट घडलं.’ ‘मला इंडस्ट्रीत हरवलेल्या मुलासारखं वाटत होतं. सलमान खानमुळे मी अहंकारी झाले आहे, असं लोकांना वाटू लागलं.’

झरीन खान पुढे म्हणाली, ‘एक वेळ अशी आली जेव्हा मी घरातून बाहेर पडायला घाबरत होते कारण लोक माझ्यावर अश्लील कमेंट करायचे. लोक मला विचित्र नावांनी हाक मारायचे, मला काम मिळत नव्हतं.’ ‘कतरिना कैफशी तुलना केल्याचा फटका मला सहन करावा लागला…’ असा खुलासा झरीनने केला आहे.

Leave a Reply