मूल नको म्हणून या अभिनेत्रीनं दिला डॉक्टर नवऱ्याला घटस्फोट; नंतर या प्रसिद्ध अभिनेत्यासोबत थाटला दुसरा संसार.!

मनोरंजन

बॉलीवूडमध्ये नाव कमावणं अनेकांचं स्वप्न असतं, पण सगळ्यांना ते नाव टिकवणं जमत नाही. आज आम्ही तुम्हाला अशा एका अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत जिने पहिल्या सिनेमातूनच आपली ओळख निर्माण केली. ती लोकप्रिय झाली पण तिचं स्टारडम टिकू शकलं नाही. करिअरच्या शिखरावर असताना लग्न करून तिने चित्रपटसृष्टीतुन कायमची एक्झिट घेतली. त्यानंतर अनेक वर्षांनी तिने बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. पण ज्या संसारासाठी तिने करिअर सोडलं तोही टिकला नाही. कोण होती ती अभिनेत्री जाणून घ्या.

   

आज आम्ही तुम्हाला ज्या अभिनेत्रीविषयी सांगणार आहोत ती आहे पूजा बत्रा. पूजाने आपल्या करिअरची सुरुवात सौंदर्य स्पर्धांमधून केली होती. एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या पूजा बत्राचे वडील सैन्यात होते आणि आई मॉडेल होती. आईकडून प्रेरणा घेऊन या अभिनेत्रीने मॉडेलिंगमध्ये प्रवेश केला आणि तिथूनच तिच्या आयुष्याला नवं वळण मिळालं.

पूजा बत्रा 1993 मध्ये ‘फेमिना मिस इंडिया’मध्ये सहभागी झाली होती. लिरिल साबण आणि हेड अँड शोल्डर्सच्या जाहिरातींमधून अभिनेत्रीला चांगली लोकप्रियता मिळाली. त्यानंतर तिला काम मिळू लागलं. पूजा बत्रानं 1997 मध्ये अनिल कपूर आणि तब्बूच्या ‘विरासत’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या अभिनेत्रीनं तिच्या पहिल्याच चित्रपटात आपल्या दमदार अभिनयानं तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर तिने ‘भाई’, ‘हसीना मान जायेगी’, ‘दिल ने फिर याद किया’ सारख्या अनेक चित्रपटात काम केलं.

हे वाचा:   ही पाकिस्तानी अभिनेत्री जिने केले होते चार चार लग्न; त्यातले दोघेजण तर भारतातलेच प्रसिद्ध अभिनेते होते.!

अभिनेत्रीनं जवळपास 30 चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर, तिच्या करिअरच्या शिखरावर लग्न केलं आणि इंडस्ट्रीला रामराम ठोकला. पूजा बत्राने अमेरिकन डॉक्टर सोनू अहलुवालियासोबत लग्न केलं. लग्नानंतर पूजा पतीसोबत यूएसला शिफ्ट झाली आणि तिथे तिच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली. अनेक वर्ष सुखी संसार केल्यानंतर दोघांमधील अंतर वाढू लागलं आणि त्यांनी 2011 मध्ये अमेरिकन कोर्टात घटस्फोटाची याचिका दाखल केली.

अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला की, लग्नाच्या काही वर्षानंतर पूजा बत्राला चित्रपटांमध्ये पुनरागमन करायचं होतं, परंतु याला पती सोनू अहलुवालिया याला कडाडून विरोध होता. बॉलीवूड वेडिंग्समधील एका रिपोर्टनुसार, अभिनेत्रीच्या पतीला लग्नानंतर एक मूल व्हावं अशी इच्छा होती, परंतु पूजाला हे नको होतं.

पूजा बत्राला करिअरमध्ये पुढे जायचं होतं. अभिनेत्रीला मुल नको होतं. याच मुद्द्यावर दोघांनी 2011 मध्ये घटस्फोट घेतला आणि अभिनेत्री भारतात परतली. 2011 मध्ये भारतात परतल्यानंतर पूजाने चित्रपटांमध्ये नवी इनिंग सुरू केली. ‘हम तुम शबाना’, ‘ABCD2’, ‘किलर पंजाबी’, ‘मिरर गेम’, ‘स्क्वाड’ यांसारख्या चित्रपटांमध्ये ती दिसली होती. पण इतक्या वर्षांनी पूजा प्रेक्षकांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरली नाही.

हे वाचा:   'कबीर सिंग' चित्रपटातली नोकरीन दिसायला आहे खूप सुंदर, या मराठमोळ्या मुलीने केला होता बो'ल्ड फोटोशूट.!

2019 मध्ये पूजा बत्राने अभिनेता नवाब शाहसोबत दुसरं लग्न केलं. नवाब शाहनं हिंदी, तमिळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तो बहुतांशी ॲक्शन चित्रपटांमध्येच दिसतो. नवाब शाह ‘भाग मिल्खा भाग’, ‘डॉन 2’ आणि ‘दिलवाले’ सारख्या चित्रपटांसाठी ओळखला जातो.

Leave a Reply