मित्रांनो, रोज सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी काहीही न खाता नागवेलीचे पान म्हणजेच विड्याचे पान किंवा खाण्याचे पान असतं ते जर पान खाल्लं तर त्याच्या शरीराला असे फायदे होतात. की ते एका चमत्कार पेक्षाही खूप मोठा आहे.
मित्रांनो कारण याच्या आयुर्वेदिक फायद्यामुळे कित्येक प्रकारच्या आजारात योग्य असून ते पूर्णपणे शरीरातून निघून जातात. तसेच बऱ्याच जणांचा असा समज असतो की, पान सेवन करणे किंवा खाणं वाईट असतं.आणि एका अर्थाने बरोबर आहे पण पान खाणं वाईट नसतं. तर त्यामध्ये जे मसाला वगैरे टाकतात तो आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असतो. केमिकलयुक्त जो मसाला आहे. काही जण तंबाखू खातात ते हानिकारक आहे.
मित्रांनो परंतु नुसतं पान हे शरीराला खूपच फायदेशीर आहे. अनेक आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये या पानाचा अतिशय महत्त्वाचा आयुर्वेदिक उपयोग सुद्धा दिलेला आहे. जे आजार शरीरात आपल्या होत असतात ते हार्मोनल इनबॅलन्समुळे होत असतात. म्हणजे तुमच्या शरीरात हार्मोन्स बॅलन्स व्यवस्थित राहत नसेल. तुम्हाला वात पित्त कफ या दोष आहेत आणि त्यामुळे उद्भवणारे आजार आहेत. याच्यासाठी काय करायच आहे तर एक साधा पान खायचा आहे. पण कुठल्याही कलकत्ता मद्रास पान नको. साध विड्याचे पान नागवेलीचे पान आणायचा आणि त्यावर एक चमचा मध टाकून हे पान आहे ते सकाळी उठल्याबरोबर खायचा आहे.
मित्रांनो सकाळी उठून फक्त तोंड धुवायचा आहे. हे पान त्यानंतर खायचा आहे. पान तुम्हाला चावून चावून त्याचा रस गिळून घ्यायचा आहे. फक्त हे पान आहे ते उपाशीपोटी खायचा आहे आणि त्यानंतर काही खायचं नाही. चहा कॉफी नाष्टा सुद्धा घ्यायचा नाही. त्यामध्ये दुसरं काही टाकायचं नाही. यामुळे शरीराला मधले सर्व जे हार्मोन आहे ते बॅलन्स होतात. आणखी एक फायदा याचा असा होतो की चेहऱ्यावर तेज निर्माण होतं. ब्लड सर्क्युलेशन तुमचं चांगलं होतं प्युरिफायर यांनी चांगल्या रीतीने होतं आणि त्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो.
जे अॅलर्जीचे वगैरे आजार आहेत ते निघून जातात त्यांना पचन संस्थेशी संबंधित आजार आहे आणि व्यवस्थित पचत नसेल, छाती मध्ये जळजळ होत असेल, गॅसेस होत असतील तर सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी फक्त विड्याच्या पानात पाव चमचा ओवा घालून खायचे आहे. फक्त पान चावून चावून त्याचा रस गिळायचा आहे. त्यानंतर अर्धा तास काही खायचं नाही. चहासुद्धा प्यायचा नाही आणि पाणीसुद्धा प्यायचं नाही. असं जर तुम्ही तीन दिवस केलं किंवा जास्त दिवस पण करू शकता. पण फक्त तीन दिवसांमध्ये तुम्हाला हा फरक जाणवेल.
या उपायाने तुमची पचनसंस्था चांगली होईल. आणि छातीमध्ये होणारी जळजळ आहे ती कमी होऊन जाईल. त्याच बरोबर करपट ढेकर, गॅस, अपचन या ज्या समस्या आहेत त्या निघून जातात. जर तुम्हाला कंबरदुखीचा त्रास असेल, मान दुखीचा त्रास असेल, पाठदुखीचा त्रास असेल, गुडघेदुखीचा त्रास असेल, सांधेदुखीचा त्रास असेल किंवा कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारा तुम्हाला कुठलाही त्रास असेल,
तर मित्रांनो फक्त पान सकाळी खायच आहे. त्यामध्ये खायचा चुना असतो किंवा आपण चुना खातो तो चुना तांदळाच्या दाण्याएवढा चुना त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि तीन दिवस या पद्धतीने पान खायचा आहे. जर असं केलं तर सांध्यावर आलेली सूज पूर्णपणे निघून जाते. शरीरामध्ये कॅल्शियम खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण व्हायला लागतं आणि कॅल्शियमची कमतरता यामुळे विविध प्रकारचे आजार होतात ते अजिबात होत नाहीत.
मित्रांनो टाच दुखी गुडघे दुखी असे कोणतेही सांधे दुखत असतील तर नागवेलीच्या पानावर म्हणजेच विड्याच्या पानावर तूप लावून पान तव्यावर ठेवून गरम करून घ्या आणि तुम्हाला सोसवेल इतकेच गरम असताना दुखणाऱ्या भागावर लावा. तुपाची बाजू तुमच्या दुखणार्या भागावर असू दे आणि त्यावर एखादा सुती कपडा बांधून रात्रभर तसंच ठेवाल्यामुळे गुडघे दुखत असतील कोणताही अवयव दुखत असेल तर तो दुखायचा बंद होईल.
मित्रांनो, ज्यांना सतत खोकला होतो, जास्त प्रमाणामध्ये कफ जाणवतो, थंडीच्या दिवसांमध्ये कफ-खोकला होतो यासाठी या पानाचा वापर करता येतो. त्यासाठी एक पान घ्यायचा आहे आणि त्यावर एक चमचा ओवा टाकायचा आहे. आणि हे पान आहे ते अगदी हळूहळू चाऊन खायचे आहे. त्याचा रस गिळून घ्यायचा आहे. मित्रांनो आता हा उपाय आहे तो पाच वर्षापासून पुढच्या मुलांसाठी सुद्धा करता येतो. पण त्यासाठी चुन्याच प्रमाणे आहे ते थोडंसं कमी वापरावे लागते. यामुळे काय होतं शरीरामधल्या कफ पूर्णपणे जळून जातो आणि खोकल्याचा त्रास आहे तो पूर्णपणे थांबून जातो.
मित्रांनो हिवाळ्यामध्ये अनेक औषधाने बरा न होणारा खोकला या साध्या उपायांनी बरा होतो. ते अतिशय उत्तम उपाय आहेत तर पाणी आपल्या शरीराला खूप महत्त्वाचं आहे फक्त त्याचा वापर जो आहे तो या पद्धतीने केला तर.विशेष करून हार्मोनल इनबॅलन्स, वात कफ आणि पित्त विकाराचे त्रास वारंवार तोंड येणे अशा समस्या असतील तर विड्याच्या पानावर तूप लावून खा यामुळे पचन संस्था चांगली सुधारेल तर हा साधा उपाय तुम्ही अवश्य करून बघा.
वरील माहिती ही वेगवेगळ्या स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आलेली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती.अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आत्ताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.