मित्रांनो सध्याच्या धावपळीच्या लाइफस्टाइल मध्ये केसांची योग्य काळजी घेणे जमत नाही. त्यामुळे बऱ्याच जणांना कोंडा म्हणजेच डेंड्रफ चा त्रास होऊ लागतो. केसांमध्ये असलेला कोंडा आपल्याला अक्षरशः है’राण करून टाकतो. त्यामुळे डोक्यात कोंडा झाल्यावर काय करावे हा प्रश्न प्रत्येकाच्या पुढे आ वासून उभा राहतो.
आजच्या लेखात आपण केसातील कोंडा घालवण्याचे घरगुती उपाय जाणून घेणार आहोत. या लेखातील घरगुती उपाय करून तुम्ही दहा मिनिटात केसातील डँड्रफ काढू शकतात व या उपायांचे काहीही साईड इफेक्ट नाही आहेत. तर चला सुरु करूया.
डेंड्रफ अर्थात कोंडा हा केसातील मृत त्वचेपासून बनलेला असतो. केसात कोंडा होणे हा डोक्याच्या त्वचेसं-बंधी एक विकार आहे. केसातील डँड्रफ मुळे डोक्यात खाज येणे, पांढऱ्या रंगाच्या कोंडा खाली पडणे व असहज वाटू लागणे इत्यादी समस्या निर्माण होतात. केसात कोंडा होऊ नये ही सामान्य समस्या आहे. असे मानले जाते की जगभरातील 50 टक्के लोकसंख्या केसातील कोंडाच्या समस्यांनी त्रस्त आहे. केसातील कोंडयामुळे केस गळू लागतात व कालांतराने टक्कल पडते.
केसात कोंडा होण्याची कारणे: कोंडा होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. काही प्रमुख केसात कोंडा होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
कोरडी त्वचा : केसातील कोंडा च्या समस्याचे प्रमुख कारण कोरडी त्वचा हेच आहे. खासकरून हिवाळ्यात जेव्हा संपूर्ण शरीराची त्वचा कोरडी होऊ लागते तेव्हा डेंड्रफ ची समस्या देखील वाढते. जर शरीरावरील इतर अवयवांची त्वचा कोरडी असेल तर अशा व्यक्तीला केसातील कोंडा होऊ लागतो.
चुकीचे पदार्थ खाणे: शरीरासाठी अन हेल्थी असलेले पदार्थ खाल्ल्याने देखील केसांमध्ये कोंडा वाढू लागतो. आईस क्रीम, पिझ्झा, कोल्ड्रिंक, बर्गर, समोसा, कचोरी यासारख्या फास्ट फूड मुळे शरीराची रोग प्रतिरोधक क्षमता कमी होते. ज्यामुळे हार्मोनल असंतुलन तयार होते. व यामुळे केसांमध्ये मृत पेशी वाढू लागतात.
मा’नसिक त’णाव: आज काल अनेक लोक डिप्रेशनमध्ये जगत आहेत. ज्यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात. यामुळे देखील केसांमध्ये कोंडा वाढायला लागतो. केमिकल युक्त हेअर प्रॉडक्ट वापरणे: अनेकदा केस कलर करण्यासाठी लोक अमोनिया युक्त हेअर कलर चा वापर करतात. दीर्घ काळापर्यंत याचा वापर केल्याने केसांची त्वचा कोरडी होऊ लागते. याशिवाय केमिकलयुक्त तेल केसांमध्ये लावल्याने देखील कोंडा वाढू शकतो.
आता पाहूया केसातील कोंडा घालवण्याचे उपाय.
लिंबाच्या झाडाचे तेल: लिंब हा अनेक औषधीयुक्त गुणकारी वृक्ष आहे. याचे एक एक पान विविध शारीरिक रोगांना दूर करण्याची क्षमता ठेवते. डेंड्रफ चा घरगुती उपाय म्हणून 15 ते 20 कडुलिंबाची पाने तोडून एक कप पाण्यात चांगल्या उकडून घ्याव्यात. आता या पानांचे पेस्ट बनवून त्याला संपूर्ण केसांच्या आतील त्वचेवर लावावे. तीस मिनिटानंतर शाम्पू आणि कंडिशनर लावून केस धुवावे.
कोरफड व कोरफड ज्यूस हे एक अत्यंत गुणकारी असे औ’षध आहे जे केसातील डेंड्रफ कमी करण्यासाठी देखील अत्यंत लाभदायी ठरू शकते. एवढेच नव्हे तर नैसर्गिक रित्या केसांना मोईश्चरराईज करण्यासाठी देखील कोरफडच्या वापर केला जाऊ शकतो. केसातील कोंडाच्या समस्येत केसांमध्ये कोरफड चा वापर करण्याकरिता आंघोळीच्या आधी पंधरा मिनिटे एलोवेरा जेल केसांच्या त्वचेत लावावे. त्याच्या 15 मिनिटानंतर अंघोळी सोबत केसांना स्वच्छ धुवावे.
लिंबू, केसातील कोंड्यासाठी अत्यंत प्रभावी औ’षध:- लिंबात सिट्रिक एसिड असते जे केसातील कोंडा तयार करणाऱ्या जं’तूंना नष्ट करते. म्हणून केसातील कोंडा काढून टाकण्याकरिता अंघोळीच्या आधी लिंबुची एक फोड घेऊन केसांच्या त्वचेवर घासावी. लिंबातील संपूर्ण रस केसांच्या आत जावू द्यावा. हा प्रयोग केल्याच्या 20 मिनिटानंतर केस कोमट पाण्याने धुवून घ्यावेत.
पुढे वाचा केसात कोंडा होऊ नये म्हणून काही महत्त्वाच्या गोष्टी:- कोरडे पदार्थ खाऊ नयेत. भरपूर पाणी प्यावे व .शरीराला जास्तीत जास्त हाइड्रेटेड ठेवावे.पोष्टिक पदार्थ खावेत. फास्ट फूड व अन् हेल्दी पदार्थांपासून दूर राहावे.केस विंचरण्याआधी कंगवा स्वच्छ करावा. व कोणालाही आपला कंगवा केस विंचरण्यास देऊ नये.परत परत केस विंचरू नये.
केसांमध्ये वारंवार हात फिरवू नयेत. त्यामुळे हातावरील किटाणू केसांमध्ये जाऊन कोंडा वाढवतात. म्हणून पुन्हा पुन्हा केसांमध्ये हात फिरवू नये.केस धुतल्यानंतर केसांना पुसण्यासाठी स्वच्छ व मऊ रुमाल वापरावा. वॅ-क्स, जेल, यासारख्या केमिकल युक्त पदार्थांचा उपयोग केसांमध्ये करणे टाळावे. आज-काल धुळ मिट्टी व प्रदूषणमुळे दोन के तीन दिवसात केसात कोंडा होऊन जातो. म्हणून आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा एं’न्टी डँड्रफ शाम्पू लावून केस धुवावेत.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.