सिनेइंडस्ट्रीत दरवर्षी अनेक सिनेमे तयार होत असतात. काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक करतात. हे सिनेमे प्रेक्षकांच्या मनात आपलं एक वेगळं स्थान निर्माण करतात. त्यातील आइकॉनिक पात्र प्रेक्षकांच्या वर्षानुवर्ष लक्षात राहतात. या आइकॉनिक पात्रांसाठी वापरण्यात आलेले कपडे इतर वस्तू देखील चांगला प्रसिद्ध झाल्या.
प्रेक्षकांमध्ये बॉलिवूड स्टार्सबरोबर त्यांनी वापरलेल्या वस्तूंची क्रेझ देखील पाहायला मिळतेय. अगदी सलमान खाननं वापरलेला टॉवेल ते आमिर खानची बॅट, माधुरीच्या साडीपर्यंत सगळ्या वस्तूंची चाहत्यांमध्ये वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. कलाकारांच्या वस्तू या लाखो रुपयांना विकल्या गेल्यात. 2000मध्ये आलेला आमिर खानचा लगान हा सिनेमा सुपरहिट ठरला. या सिनेमात आमिरनं वापरलेली बॅट 1 लाख 56 हजारांना लिलावात विकली गेली. या बॅटवर आमिरची ऑटोग्राफ देखील होती.
सलमान खानच्या मुझसे शादी करोगी सिनेमातील जीने के हैं चार दिन हे फेमस गाणं सर्वांना माहिती आहे. या गाण्यात सलमान खान टॉवेल घेऊन नाचताना दिसतो. सलमानचा हा टॉवेल तब्बल 1 लाख 42 हजारांना विकण्यात आलाय. अभिनेत्री प्रियांका चोप्रानं ऑटोग्राफ मध्ये घातलेले लुबोटिन शुज तब्बल 2.45 लाखांना विकले गेले होते. तसंच प्रियांचा गेविन मिगुएल ड्रेस 5 हजारांमध्ये विकण्यात आला होता.
अक्षय कुमारने ओह माय गॉड या सिनेमात भगवान श्रीकृष्णांची भूमिका साकारली होती. त्यासाठी त्याने घातलेल्या ड्रेसचा 15 लाखांना लिलाव करण्यात आला. अभिनेते देवानंदच्या स्टाइलची चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ होती. देवानंदचा केवळ एक ब्लॅक अँड व्हाइट फोटो 4 लाखांना विकण्यात आला.उमराव जान सिनेमात अभिनेता फारूख शेखनं एक सिल्वर अंगठी घातली होती. ही अंगठी 96 हजारांना विकण्यात आली होती.
अभिनेत्री करीना कपूर हिनं हिरोइन, हलकट जवानी सिनेमात ज्या साड्या नेसल्या होत्या त्या साड्या एका चॅरिटेबल असोसिएशनला दान करण्यात आल्या. तर बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितनं धक धक करने लगा या गाण्यानं नेसलेल्या त्या साडीचा 80 हजारांना लिलाव करण्यात आला. अभिनेते शम्मी यांचं चाहे मुझे कोई जंगली कहे हे गाणं खूप प्रसिद्ध झालं होतं. या गाण्यातील त्यांचं जॅकेट सर्वांचं लक्ष वेधून घेत. शम्मी कपूरचं हे जॅकेट आमिर खानन 88 हजारांना विकत घेतलं होतं.