चंद्रमुखी 2 मधील कंगना राणौतचा फर्स्ट लूक आला समोर; हिरवी साडी, पारंपारिक दागिने, कुरळे केस अन्…,

मनोरंजन

बहुप्रतिक्षीत ‘चंद्रमुखी २’ मधून अभिनेत्री कंगना रणौतचा फर्स्ट लूक समोर आला आहे. कंगना रणौतची मुख्य भूमिका असलेल्या हॉरर कॉमेडी चित्रपटातील काही पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. लायका प्रॉडक्शनने चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज केले आहे. ज्यामध्ये कंगना हिरव्या रंगाची साडी नेसलेली दिसत आहे.

या पोस्टरमध्ये कंगना रणौतचा पारंपारिक लूक पाहायला मिळत आहे. हिरव्या रंगाची साडी, त्यावर खूप सारे दागिने घातलेला लूक व्हायरल होत आहे. सोबतच तिची पोज व तिची रोख नजर या पोस्टरमध्ये दिसत आहे. तिच्या या लूकमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.

कंगनाचे लूक पोस्टर शेअर करताना लायका प्रॉडक्शनने कॅप्शनमध्ये लिहिल, ‘लक्ष वेधून घेणारे सौंदर्य आणि पोज! चंद्रमुखी २ मधील चंद्रमुखी म्हणून कंगना रणौतचा मोहक, जबरदस्त आणि सुंदर फर्स्ट लूक सादर करत आहोत. चित्रपट या गणेश चतुर्थीला तमिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि कन्नडमध्ये रिलीज होणार आहे!

 

View this post on Instagram

 

A post shared by Lyca Productions (@lycaproductions)

दरम्यान, ‘चंद्रमुखी २’ हा ब्लॉकबस्टर तमिळ कॉमेडी चित्रपट ‘चंद्रमुखी’चा सिक्वेल आहे. या चित्रपटात कंगना राजाच्या दरबारातील एका नर्तिकेच्या भूमिकेत दिसणार आहे, जी तिच्या सौंदर्य आणि कलेसाठी प्रसिद्ध होती. या चित्रपटात कंगनासोबत राघव मुख्य भूमिकेत दिसणार आहे. लायका प्रॉडक्शन आणि सुबास्करन यांचा हा चित्रपट सप्टेंबरमध्ये तमिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे.

हे वाचा:   घटस्फोट होऊनही या अभिनेत्रीला हृतिक रोशनला पती बनवायचे आहे, म्हणाली "एकत्र राहण्यासाठी वयाची आवश्यकता नाही.."

Leave a Reply