घट”स्फो”टाच्या 5 वर्षांनंतर मलायका-अरबाजच्या नात्याचं सत्य समोर आलं, अभिनेत्री म्हणाली- प्रेग्नन्ट असताना पण तो….

मनोरंजन

हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकारांचे वैयक्तिक आयुष्य अनेकदा चर्चेत असते. बॉलीवूड सेलिब्रिटी त्यांच्या कामाने तसेच त्यांचे लग्न, घटस्फोट, प्रेमप्रकरणांमुळे चर्चेत असतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक घटस्फोट झाले आहेत, ज्यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. बॉलिवूडमधील सर्वात महागडा घटस्फोट हा अभिनेता हृतिक रोशन आणि सुझैन खानचा होता. त्याचबरोबर सर्वाधिक चर्चेत असलेल्या घटस्फोटांमध्ये अरबाज खान आणि मलायका अरोरा यांच्या घटस्फोटाचा समावेश आहे. दोघांचे 19 वर्ष जुने वैवाहिक जीवन तुटले आणि त्यामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का बसला. 2017 सालची गोष्ट आहे.

मलायका आणि अरबाज खान यांचा 2017 मध्ये घटस्फोट झाला. दोघांनी 1998 मध्ये लग्न केले होते. घटस्फोटाने त्यांचे 19 वर्ष जुने नाते संपुष्टात आले होते. मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटाला पाच वर्षे झाली आहेत. दोघांनीही वैयक्तिक आयुष्यात खूप प्रगती केली आहे. घटस्फोटानंतर मलायका अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे, तर अरबाज इटालियन मॉडेल जॉर्जिया एंड्रियानीसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. मलायका आणि अरबाजमध्ये अजूनही चांगले संबंध आहेत. आताही दोघेही त्यांचा मुलगा अरहान खानच्या निमित्ताने अनेकदा भेटत असतात.

हे वाचा:   २ बायका, ६ मुलं आणि नातवंडांनी भरलेलं आहे धर्मेंद्रचे कुटुंब, धर्मेंद्र यांच्या कुटुंबाचे काही न पाहिलेले सुंदर फोटो....

मलायका आणि अरबाज यांची पहिली भेट 1994 मध्ये झाली होती. त्यानंतर कॉफीच्या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान दोघे पहिल्यांदा भेटले. यानंतर दोघांची मैत्री झाली आणि दोघांनी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मलायका आणि अरबाज यांच्यातील डेटिंग चार ते पाच वर्षे चालली. 1994 मध्ये भेटल्यानंतर दोघांनी डेट करायला सुरुवात केली. 1998 मध्ये या जोडप्याने या नात्याला नवीन नाव दिले होते. 1998 मध्ये दोघांनी मुस्लिम आणि ख्रिश्चन रितीरिवाजानुसार लग्न केले.

1998 मध्ये लग्न झाल्यानंतर मलायका आणि अरबाज खान एका मुलाचे पालक झाले. अरहान खान असे या जोडप्याच्या मुलाचे नाव असून तो २० वर्षांचा आहे. अरहानचा जन्म 9 नोव्हेंबर 2002 रोजी झाला. घटस्फोटानंतर मलाइकाला अरहानची कस्टडी मिळाली. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मलायकाने तिचे प्रेग्नेंसीचे दिवस आठवले. तिने सांगितले होते की, तिला काम करायला आवडते आणि गरोदरपणातही तिने कामातून ब्रेक घेतला नाही.

Leave a Reply