या कारणामुळे अविवाहित राहील करण जोहर; म्हणाला कोणालाच माझ्यासोबत तसले संबंध….

मनोरंजन

बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी वय ओलांडल्यानंतरही लग्न केले नाही. या यादीत सलमान खान, एकता कपूर, आशा पारेख, अक्षय खन्ना यांसारख्या अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. यामध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचेही नाव येते. त्याचेही अजून लग्न झालेले नाही. करण जोहर 50 वर्षांचा असला तरी तो बॅचलर आहे. यावर्षी मे महिन्यात त्यांनी 50 वा वाढदिवस साजरा केला.

   

त्याने अलीकडेच म्हटले आहे की, 50 वर्षांत मी कोणत्याही ठोस नातेसंबंधात नाही. अनेकवेळा मला रिलेशनशिपमध्ये येऊ शकते असे वाटले, असेही त्याने कबूल केले. मात्र, गोष्टी प्रत्यक्षात येऊ शकल्या नाहीत. अलीकडेच करण जोहर अभिनेत्री ट्विंकल खन्नाच्या शो ट्वीक इंडियामध्ये पोहोचला होता. येथे त्याने ट्विंकलसोबत खूप गप्पा मारल्या. करणने ट्विंकलसमोर खुलासा केला की, त्याच्या भावना न समजणाऱ्या लोकांचा पाठलाग करण्याचा तो पॅटर्न फॉलो करू लागला आहे.

हे वाचा:   एका चुकीमुळे संपले हिरो नंबर 1गोविंदाचे करीयर , एकच वेळी केले होते 70 चित्रपट

करण जाहेरने स्पष्ट केले आहे की, तो त्याच्या आयुष्यात पुन्हा कोणाला येऊ देऊ इच्छित नाही. त्याच्या मते, आता त्याला फक्त त्याची आई आणि मुलांबद्दलच वाटतं. जेव्हा कोणी माझ्या जवळ येते तेव्हा मी दूर जातो. ही खूप मोठी समस्या आहे. करण जोहरने त्याच्या समस्येबद्दल थेरपिस्ट आणि मानसशास्त्रज्ञांशीही चर्चा केली आहे. त्यासाठी त्यांनी अनेक सत्रेही घेतली आहेत. मात्र, कदाचित करणला त्याचा काही फायदा झाला नसावा, असे दिसते. त्याने ट्विंकल खन्नासमोर कबुली दिली की, मला जणू कोणीतरी कैद केले आहे.

करण जोहरने पुढे आपली व्यथा मांडत म्हटले की, मला त्या पिंजऱ्यातून बाहेर पडावेसे वाटते. पण जेव्हा माझ्याकडे प्रेम नसते तेव्हा मी त्याचा पाठलाग करू लागतो. करणने त्याच्या वैयक्तिक आयुष्याविषयी अनेक गोष्टींबद्दल सांगितले.

हे वाचा:   'हेच शिवरायांचे मावळे'; कोसळणाऱ्या धबधब्यातून खाली उतरला परशा; सह्याद्रीमध्ये रंगला साहसी खेळ.!

50 वर्षीय करण जोहरने लग्न केले नसले तरी माहितीसाठी सांगतो की करण जोहर दोन मुलांचा पिता आहे. रुही जोहर आणि यश जोहर अशी त्यांच्या मुलांची नावे आहेत. 2017 मध्ये दोन्ही मुलांचा जन्म सरोगसीने झाला.

Leave a Reply