‘मला वाटतं की सैफ सोडून अर्जुनशी लग्न करावं’ करीना कपूरने केली इच्छा व्यक्त….

मनोरंजन

फिल्म इंडस्ट्रीत सैफ आणि करिनाच्या जोडीला सैफीना असेही म्हणतात. या दोघांची जोडी सुंदर जोडप्यांपैकी एक आहे. करीना कपूर आणि सैफ अली खान अनेकदा रोमँटिक स्टाईलमध्ये कॅमेऱ्यासमोर स्पॉट झाले आहेत. करीना कपूर सोशल मीडियावर सतत सक्रिय असते आणि ती तिच्या कुटुंबाचे फोटोही शेअर करत असते.

   

सैफ अली खान आणि करीना कपूर यांनी अनेक वर्षे डेटिंग केल्यानंतर 2012 मध्ये एकमेकांशी लग्न केले. सैफ अली खान दोन मुलांचा पिता आहे.करीना कपूरचा मुलगा तैमूर अली खान सोशल मीडियापासून मेन स्ट्रीम मीडियापर्यंत चर्चेत असतो. करीना कपूरच्या आधी सैफ अली खानने अमृता सिंहसोबत लग्न केले होते.

सैफ आणि अमृता सिंग यांनी 1991 मध्ये लग्न केले. अमृता सिंग त्यांच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठ्या असल्या तरी त्यांच्यातील प्रेम इतकं होतं की वयही आड येत नव्हतं. सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचा 2004 मध्ये घटस्फोट झाला. अमृता सिंग आणि सैफ अली खान यांना दोन मुले आहेत. सारा अली खानने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे तर इब्राहिमही बॉलिवूडमध्ये डेब्यू करू शकतो.

हे वाचा:   बॉलीवूड मधे सर्वात जास्त विवादित आहेत हे ५ फोटो, नं ३ चा फोटो पाहून तर धक्काच बसेल !

करीना कपूरने सैफ अली खानसोबतच्या पहिल्या भेटीचा खुलासा करताना अनेक गोष्टी लोकांसोबत शेअर केल्या आहेत. एका गोष्टीचा खुलासा करताना करीना कपूर म्हणाली की, तिला सैफ सोडून अर्जुन कपूरसोबत लग्न करायचे आहे. चला तर मग हे गुपित उघड करू आणि करीना कपूरने असं का म्हटलं?

करीना कपूर आणि अर्जुन कपूर यांनी “की अँड का” चित्रपटात एकत्र काम केले आहे. या चित्रपटात दोघांनी ऑनस्क्रीन पती-पत्नीची भूमिका साकारली होती.ही जोडी लोकांना खूप आवडली होती.हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नसला तरी अर्जुन कपूर आणि करीना कपूरची केमिस्ट्री लोकांना खूप आवडली होती.

खरं तर, “की अँड का” या चित्रपटानंतर जेव्हा करीना कपूरला सैफ अली खान आणि अर्जुन कपूर यांच्यात तुलना करण्यास सांगण्यात आले तेव्हा तिने धक्कादायकपणे सांगितले की, अर्जुनची इतकी मेहनत पाहून मला सैफ अली खानची तुलना अर्जुन कपूरशी करावीशी वाटते. त्याच्यासोबत माझे लग्न झाले पाहिजे.

हे वाचा:   तो एक चित्रपट ज्यासाठी करीना कपूरने उतरवले होते सर्व कपडे..आता सांगितला कसा होता अनुभव..

करीना कपूरने हे मजेशीरपणे सांगितले आहे. सैफ अली खान आणि अर्जुन कपूर यांची कधीच तुलना होऊ शकत नाही, दोन्ही कलाकारांची काम करण्याची शैली पूर्णपणे वेगळी आहे, असे ती म्हणाली. दोघांची जीवनशैलीही एकमेकांपेक्षा खूप वेगळी आहे. अर्जुन कपूर सध्या मलायका अरोरा खानसोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे.

Leave a Reply