पूजा भट्टच्या एक्स बॉयफ्रेंडून महेश भट्ट यांची पोलखोल? म्हणाला ‘जेव्हा मी त्यांच्या मुलीसोबत होतो…’

मनोरंजन

निर्माते आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांनी त्यांच्या आयुष्यात जितके हिट सिनेमा दिले आहेत. तितकच त्यांचं आयुष्य वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. बऱ्याचदा असंही होतं की, त्यांचं नाव वादात येतं. यावेळीही काहीसं असंच झालं आहे.

   

एका अभिनेत्याने महेश भट्टवर काही असे आरोप लावले आहेत. जे तुम्हाला हैराण करण्यासाठी पुरेसे आहेत. हा अभिनेता दुसरा तिसरा कोण नसून पूजा भट्टचा एक्स बॉयफ्रेंड आहे. आम्ही बोलतोय रणवीर शौरीबद्दल जो बऱ्याच सिनेमात दिसला आहे. या अभिनेत्याने महेश भट्ट यांच्यावर अनेक आरोप लावत त्यांची पोल खोलली आहे आणि एक असं सत्य सर्वांसमोर आणलं आहे जे फारच कमी लोकांना माहिती आहे.

एक था टायगर फेम अभिनेत्याने सांगितलं की, महेश भट्ट यांनी त्याचा वापर करुन घेतला आणि हे त्याला खूप दिवसांनी समजलं. ही ती वेळ होती जेव्हा रणवीर महेश भट्ट यांच्या मुलीला डेट करत होता. रणवीरने सांगितलं की, जेव्हा मी पूजा भट्टसोबत रिलेशनशिपमध्ये होतो. तेव्हा मी महेश भट्ट यांचं खूप कौतुक करायचो. मात्र ते मात्र माझ्या आदराचा वापर करुन घ्यायचे. हे पाहून मला खूप वाटायचं. ते नेहमीच माझ्या विरोधात होते. आणि म्हणूनच मला इंडस्ट्रीत दुहेरी वागणूक मिळायची.” रणवीर एवढ्यावर थांबला नाही तर त्याने त्याच्या मनातल्या अनेक गोष्टींचा यावेळी खुलासा केला.

हे वाचा:   अफाट संपत्ती असूनही कंगनाची आई करतेय शेती, पहा शेतातील काही फोटोस....

पुढे अभिनेत्याने इडस्ट्रीतल्या गट बाजीबद्दल मोठा खुलासा केला आहे. रणवीर शौरीच्या म्हणण्यानुसार इंड्स्ट्रीमध्ये खूप गट बाजी होते. ”सुशांतच्या मृत्यूनंतर रणवीरला वाटले की त्याने याविरोधात बोलावे. तुम्ही इंडस्ट्रीतील कोणालाही या ऑफ द रेकॉर्डबद्दल विचारू शकता. पण असे घडते असे म्हणत मी रेकॉर्डवर आहे. इंडस्ट्रीत कुणाचे करिअर खराब करून दुसऱ्याला पुढे आणले जाते. “हे अनेकदा घडते.”

सुशांतच्या मृत्यूनंतर रणवीरला असं वाटलं की, त्याच्या विरोधात बोललं पाहिजे. इंडस्ट्रीमध्ये ऑफ रिकॉर्ड आपण कोणालाही याविषयी विचारु शकतो. मात्र मी ऑन रेकॉर्ड बोलत आहे. इंडस्ट्रीमध्ये कोणाचं करिअर खराब करुन दुसऱ्यांना पुढे आणलं जातं. असं नेहमीच होतं हे आपण बऱ्याचदा होताना पाहिलं आहे. आता रणवीरचं हे वक्तव्य फार मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आणि लोकं यावर मोकळेपणाने बोलत आहे. रणवीर बऱ्यात दिवसांपासून कोणत्याच सिनेमाचा हिस्सा बनला नाहीये.

Leave a Reply