नमस्कार मित्रांनो,
घरातील महिलांनी गॅस (शेगडी) जवळ किंवा चुली जवळ या वस्तू चुकूनही ठेऊ नयेत. या वस्तू ठेवल्याने आपल्या घरात गरिबी येते. घरातील लक्ष्मी निघून जाते. तुम्ही असे खूप घरे पाहिली असतील की ज्या ठिकाणी लोक खूप काबाडकष्ट करतात रात्रंदिवस मेहनत करतात. मात्र त्यांच्या घरात लक्ष्मी आलेली काही दिसत नाही. जर आपण ही या पैकी असाल. तर या चूका आपण कटाक्षाने टाळा.
आपल्या स्वयंपाक घरमध्ये माता अन्नपूर्णा वास करत असते. आणि ती नेहमी प्रसन्न कशी राहील याची काळजी आपण घ्या. ज्या स्वयंपाक घरातील अन्नपूर्णा प्रसन्न असते त्या घराची बरकत नक्की होते. अश्या घरात लक्ष्मी निवास करते. गृहिणींसाठी छोटे-छोटे नियम आहेत. ते आज आपण जाणून घेणार आहोत.
नेहमी स्वयंपाक करण्याआधी स्वच्छ स्नान करा. व मन निर्मळ ठेऊन मनात कोणतेही कटुभाव किंवा एखाद्या बद्दल काही चुकीच्या भावना आपल्या मनात ठेऊन स्वयंपाक बनवू नये. जर अश्या प्रकारे आपण आपल्या स्वयंपाक घरात अन्न तयार केलं आणि ते आपल्या घराचे खात असतील. तर सर्वांना चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते.
एक गोष्ट लक्षात ठेवा. आपल्या गॅस (शेगडी) जवळ आपण नेहमी मिठाचा डबा असेल साखर किंवा तूप असेल. या शुक्राला मजबूर करणाऱ्या वस्तू नेहमी ठेवत चला यामुळे शुक्र मजबूत बनतो. शुक्र हा सुख,समृद्धी,भोग,विलास,ऐश्वर्य यांचा कारक ग्रह आहे. तुम्हाला जर या सर्व गोष्टींची प्राप्ती करायची असेल. तर या 3 वस्तू आवर्जून आपल्या गॅस जवळ नक्की ठेवा.
आता गॅस (शेगडी) जवळ काय ठेवायचं नाही. पहिली गोष्ट कोणत्याही स्वरूपाच जलपात्र म्हणजे पाण्याचं भांड, माठ असेल किंवा आता आपण वॉटर फिल्टर वापरतो. अश्या प्रकारचे कोणतेही जलपात्र आपण गॅस जवळ ठेवायचं नाही. गॅस मधून ज्या काही ज्वाला बाहेर पडतात त्या अग्निच स्वरूप आहेत.
आणि जलपात्र त्यात जे जल आहे ते जल तत्वाचा कारक आहे. जेव्हा जल आणि अग्नी एकत्र येतात. तेव्हा अश्या ठिकाणी धन नाश होण्याचा संभव असतो. घरात असणारा पैसा व्यर्थ वाया जातो. दुसरी गोष्ट आपण स्वयंपाकात जे तेल वापरतो हे तेल सुद्धा गॅस जवळ ठेऊ नये. स्वयंपाक करताना थोडा वेळ चालत पण स्वयंपाक झाल्यावर ते दूर ठेवलेलं चांगल.
आणि त्यातल्या त्यात वापरून जे शिल्लक राहिलेलं तेल राहत. जर एखादा पदार्थ तुम्ही तळात ते तेल तुम्ही गॅस जवळ ठेवल्यास यामुळे तुमचा शनी कमजोर होतो तुम्हाला शनी दोष लागतो. आणि अश्या घरात आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. तिसरी गोष्ट स्वयंपाक घरात कोणत्याही प्रकारच रोपटं किंवा मनी प्लांट हे आपण कधीच ठेवू नये. व नेहमी स्वच्छ मनाने स्वयंपाक करायचा आहे.
गॅस जवळ कधीच खरकटी भांडी ठेऊ नका. यामुळे घरात खूप मोठ्या प्रकारचे दोष उत्पन्न होतात. एक चुकीची सवय अनेक महिलांना असते. की जेव्हा ते स्वयंपाक बवतात व तवा किंवा कढई गरम असते. तेव्हा ते सिंकमध्ये ठेवले जाते आणि त्यावर पाणी सोडले जाते. जेव्हा ते पाणी सोडले जाते आणि तो एक प्रकारचा आवाज बाहेर पडतो.
या गरम तव्यावर किंवा कढईवर पाणी टाकल्यावर जो आवाज येतो. तो आवाज अत्यंत अशुभ असतो. आणि यामुळे घरात मोठं-मोठे वादविवाद, क्लेश, रुसवा निर्माण होऊ लागतो. नात्यात कटुता उत्पन्न होते घरातील पैसा व्यर्थ वाया जाणं अश्या सर्व गोष्टी घडून येतात. तर या आहेत त्या वस्तू ज्या गॅस(शेगडी) जवळ चुकूनही ठेऊ नयेत.