सलमानसोबत झळकणाऱ्या या अभिनेत्रीवर आली वाईट वेळ; आजारपणात करतेय ‘हे’ काम..

मनोरंजन

बॉलिवूडमध्ये नाव कमावणं आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. केवळ सौंदर्यच नाही तर दमदार अभिनयाच्या दमावरच या ग्लॅमर वर्ल्डमध्ये ओळखं बनवली जाते. बरेच लोकं बॉलिवूडमध्ये एन्ट्रीतर करतात मात्र यशस्वी होत नाही. यातले काही अयशस्वी झाल्यावर स्वत:ला संभाळतात मात्र काही लोकं खूप तुटतात.

   

सलमान खानची को-एक्ट्रेलची हालत या इडस्ट्रीमध्ये काही लोकांना वर्षानुवर्ष धक्के खावे लागतात. तर काही आपलं नशिब आणि मेहनतच्या जोरावर खूप लवकर स्टारडम मिळवतात. मात्र ते हे संभाळू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत जी 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध झाली मात्र सध्या तिची अवस्था खूप वाईट झाली आहे. ही अभिनेत्री आज आपलं आयुष्य जगण्यासाठी केवळ १०० रुपयांत काम करते.

रातोरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री पूजा डडवाल १९९५ साली आलेल्या सलमान खानसोबत वीरगती सिनेमात झळकली होती. मात्र सध्या अभिनेत्रीची अवस्था फारच वाईट आहे. अभिनेत्री पूजाचा हा सिनेमा फ्लॉप झाला होता. मात्र या सिनेमाने पूजाला एका रात्रीत प्रसिद्धी दिली. मात्र पूजा तिचं हे फेम फारवेळ संभाळू शकली नाही आणि हळूहळू तिच्या करिअरची उतरतीकळा सुरु झाली आणि अभिनेत्रीला काम मिळणं बंद झालं. यामुळेच पूजा ग्लॅमर वर्ल्डमधून गायब झाली होती.

हे वाचा:   सलमाननं केलं लॉन्च; पण कतरीनामुळं बरबाद झालं या अभिनेत्रीचं करिअर; म्हणाली 'मी सलमानसोबत....'

यानंतर पूजा अचानक चर्चेत आली. आणि तिच्या चर्चेचं कारण होतं तिचा आजारपणा. अभिनेत्रीला टीबी हा गंभीर आजार झाला. पूजा डडवालला टीबीच्या आजाराने ग्रासली होती.अनेक वर्षे इंडस्ट्रीपासून दूर राहिल्यानंतर पूजाला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं आणि नंतर पूजा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मीडिया रिपोर्टनुसार पूजाच्या या वाईट वेळेत तिच्या परिवारानेदेखील तिची साथ सोडली होती. अशा परिस्थितीत अभिनेत्रीने हॉस्पिटलमध्ये खूप वाईट वेळ घालवला.

जेव्हा पूजा डडवाल टीबी आजाराने हॉस्पिटमध्ये टीबीशी झुंज देत होती, तेव्हा तिला साथ देण्यासाठी तिथे कोणीच उपस्थित नव्हतं. त्यावेळी सलमान खानच तिच्यासाठी देवदूत बनून समोर आला होता. सलमान खानने आपली को-एक्ट्रेस पूजाची मदत केली होती. त्याने केवळ पूजाच्या हॉस्पिटलचं बिल भरलं नाही तर, तर तिच्या तब्येतीचीदेखील खूप काळजी घेतली.

हे वाचा:   धोनीसोबत रिलेशनमध्ये राहिली आहे हि साऊथची अभिनेत्री; ब्रेकअप नंतर म्हणाली “खूपच बदनाम होते आमचे नाते”.!

आता पूजा 100 रुपयांत काम करत आहे. पूजा डडवालने या वाईट टप्प्यातून स्वतःला बाहेर काढलं आणि आजारातून बरी झाल्यानंतर स्वतःची काळजी घेतली. आजारातून बरे होताच त्यांनी पुन्हा चित्रपटात काम शोधण्यास सुरुवात केली, पण बराच काळ काम न मिळाल्याने मित्राच्या सांगण्यावरून तिने टिफिन सर्व्हिसचं काम सुरू केलं. याचा खुलासा अभिनेत्रीने तिच्या एका मुलाखतीत केला आहे.

Leave a Reply